ब्रेकिंगमहाराष्ट्र
अहमदनगर शहरात हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

नगर कल्याण रोडवरील एका हुक्का पार्लरवर अहमदनगर शहराचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकून हुक्का पार्लर उध्वस्त केले आहे.या प्रकरणी ओंकार संतोष शिंदे ( साईराम सोसायटी शिवाजीनगर नगर कल्याण रोड ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हुक्का पार्लरवर कारवाई करत जवळपास 5300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये हुक्का पॉट व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.