ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

विक्रम राठोड यांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’.. शिंदेंच्या शिवसेनेत सक्रिय

अहिल्यानगर

महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्या नगर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असताना सोमवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुतीला जय महाराष्ट्र करत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.

यानंतर लगेचच दिवंगत नेते माजी आमदार अनिल राठोड यांचे चिरंजीव, ठाकरेंच्या शिवसेनेचं पदाधिकारी विक्रम राठोड यांनी शिंदेंच्या शिवसेनेत सक्रिय होत असल्याचे जाहीर केले. राठोड यांचा अधिकृत पक्ष प्रवेश ८ जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरमधील जाहीर सभेत होणार आहे.

दरम्यान विक्रम राठोड यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, नगर शहरात २५ वर्ष माजी आमदार स्व. अनिल राठोड यांनी शिवसेना पक्ष वाढवला. धनुष्यबाण आणि राठोड यांचे अतूट नाते होते. त्यामुळेच मी आज ओरिजनल शिवसेनेत आलो आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने अनिल राठोड यांच्या निधनानंतर नगर शहरात हवे तितके लक्ष दिले नाही.

आम्ही अनेक वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. जबाबदारी सोपविण्याची मागणी केली. परंतु पुढे काहीच झाले नाही. विधानसभा निवडणुकीत नगर शहराची जागा शिवसेनेची असताना श्रीगोंद्याची जागा घेऊन नगर शहराची जागा सोडण्यात आली. आम्ही पक्षावर निष्ठा ठेवली पण पक्ष नेतृत्वाने तितका प्रतिसाद दिला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्याला ताकद देणारे नेते आहेत. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

राठोड यांचे शिर्डीतच ठरले होते …

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्याचवेळी विक्रम राठोड यांनी शिंदे यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाची चर्चा केली होती. त्यानुसार त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे, असे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी सांगितले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे