ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नवरात्री विशेष - ब्युटी विशेषांकमहाराष्ट्र

सुजाता गोटीपामुल स्वामीराज आर्ट्स च्या संचालिका यांच्या शी दिलखुलास‌ गप्पा

अहमदनगर

मी सुजाता संतोष गोटीपामुल.मी सोलापूरची आता नगरकर म्हणजेच अहमदनगर माझे शिक्षण फार नाही 12 वी पर्यंत झाले आहे.

आम्ही फायबर आर्टिकल बनवतो जसे की शिवाजी महाराज, शंकर महाराज,महावतार बाबाजी,विठ्ठल रुक्मिणी,शेतकरी व बैलजोडी तसेच विविध संत अणि महाराज मंडळीचे मूर्ती उपलब्ध आहेत.

तसेच ऑर्डर प्रमाणे वेगवेगळे ट्रॉफीज देखील बनवतो आम्ही 2-3 इंच ते 5-6 फुट उंची पर्यंत कोणतेही मूर्ती सहज बनवतो हा व्यवसाय माझ्या पतीने निवडला. त्यांना कलेचे आवड असल्याने इथे नगर मध्येच एका मोठ्या कंपनीत ते ही काम शिकले त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत आम्ही दोघांनी मेहनतीने हा पसारा उभा केला.

आम्हाला पहिली ऑर्डर मिळाली ती अहमदनगर मधुन च. एका ट्राॅफी ची. आता या व्यवसायाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत.

आमच्या सोबत 5-6 सहकारी देखील काम करतात.अडचणी शिवाय कोणतेही कार्य होत नाही. त्याशिवाय आपण देखील शिकत नाहीत मला देखील बरेच अडचणी आले. पण त्यासोबत मार्ग देखील मिळाले.

यामुळे एक झाले सर्व स्तरातील जनसंपर्क झाला..अगदी सामान्य व्यक्ती ते प्रतिष्ठित उद्योजक अणि कलावंत यांच्या पर्यंत अणि जिव्हाळ्याचे नाते ही बनले.

बरेच वेळा आमचे कस्टमर मला कॉल करुन बोलतात की तुमच्या माध्यमातून आम्हाला आमचे देव मिळाले आम्ही मनोभावे पूजा करू शकतो..आपण कोणासाठी तरी माध्यम होऊ शकतो हे मोठे समाधान.

या सर्वासाठी माझ्या पतीने तर प्रोत्साहन दिलेच पण माझ्या मुलींचेही सहकार्य होते. मी त्यांना पूर्ण वेळ देऊ शकत नाही हे समजून खूप जबाबदारीने वागतात.

आपण महिलांनी स्वतः कणखर राहून स्वावलंबी व्हावे आणि त्यासाठी मेहेनत करावी. बळ मिळतेच .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे