
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे दोन महिने राजकीय ब्रेकवर गेल्या होत्या. यानंतर ‘शिवशक्ती’ यात्रेच्या माध्यमातून पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. राज्यातील विविध भागांचा दौरा पंकजा मुंडे करत आहेत.
शनिवारी ( ९ सप्टेंबर ) पंकजा मुंडे यांची ‘शिवशक्ती’ यात्रा बीडमधील पाटोदा येथे पोहोचली. तेव्हा पंकजा मुंडे यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
“मी घरी बसले नव्हते. तर, गढूळ परिस्थितीला वैतागले होते,” असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. राष्ट्रसंत भगवानबाबा जयंती उत्सव सोहळ्यानंतर पंकजा मुंडे बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी घरी बसले नव्हते. गढूळ परिस्थितीला वैतागले होते. काही बोलायलं गेलं, तर दुसरंच चालवलं जायचं. माझ्या मागे बरेच प्रश्न होते. ते सोडवण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या अडचणी आणि बरेच प्रश्न आहेत. जमेल तसे तेही प्रश्न सोडवू.”
“पंकजा मुंडे राजकारणात काय करेन, काय नाही करेन. पण, कधीही असत्य, असंवैधानिक आणि तत्वाला सोडून काम करू शकत नाही. मी रणांगणात उतरले आहे. हे रन रखरखतं आहे. काहीजण मला ‘अहंकारी’ म्हणतात.
मात्र, माझ्या मनात किंचीतही अहंकार नाही. मी ग्रामपंचायत सदस्य देखील नाही. मला तुमचा ( जनतेचा ) गर्व आहे,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.