ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व शालेय बस सेवा बंद

अहिल्यानगर

सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या दि.10 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मुकुंदनगर परिसरातील धीरज कचरुसिंग रजपूत (परदेशी) यांच्या मारहाणीत झालेल्या मृत्यूनंतर जिल्ह्यात वातावरण तापले असून विविध संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

याच पार्श्वभूमीवर काका अहिल्यानगर जिल्हा वाहतूक संघटनेच्या वतीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी धावणाऱ्या सर्व स्कूल बस उद्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.

धीरज परदेशी यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या मृत्यूप्रकरणी नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. जिल्हा बंदच्या आवाहनामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शालेय वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत संबंधित शाळांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर विविध व्यावसायिक, सामाजिक व वाहतूक संघटनांनी आपापल्या भूमिका जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे