ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात 10 वी चा ,१२ वी चा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता.

दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा निकाल कधी लागणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

१० वी, १२वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ११ मार्च रोजी संपली आहे. त्यानंतर आता महिना होऊन गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. रिपोर्टनुसार, सीबीएसई बोर्डाचा निकाल लवकरच लागणार आहे.

एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच महिन्यात कधीही निकाल लागू शकतो. मागील अनेक वर्षांच्या ट्रेंडनुसार १०वीचा निकाल एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. दरम्यान, सीबीएसई बोर्डाचा १२वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.

या वर्षी दोन टर्ममध्ये परीक्षा झाल्याने निकाल वेगवेगळ्या तारखेला लागण्याची शक्यता आहे.

सीबीएसई बोर्डाचा निकाल या वेबसाइटवर करा चेक

cbse.nic.in

results.cbse.nic.in

cbseresults.nic.in

DigiLocker

UMANG अॅप

सर्वात आधी results.cbse.nic.in या वेबसाइटवर जा.

यानंतर Class X 2026 Results किंवा Class XII 2026 Results लिंकवर क्लिक करा.

यानंतर रोल नंबर, स्कूल नंबर, जन्मतारीख, अॅडमिट कार्ड नंबर टाकायचे आहे.

यानंतर तुम्हाला स्क्रिनवर रिझल्ट दिसणार आहे.

तुम्ही मार्कशीट डाउनलोड करुन प्रिंट आउट काढू शकतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे