ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव देवी परिसराची महापौर, आयुक्तांकडून पाहणी..

भाविकांनी कायनेटिक चौक-मोहिनीनगर रेल्वे भुयारी मार्गाचा वापर करावा - महापौर ज्योतीताई गाडे

स्वच्छता, पाणी, विद्युत व्यवस्था, रस्ते, मोकाट कुत्रे, जनावरे व अतिक्रमणांबाबत तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना..

अहिल्यानगर मधील नवरात्रोत्सवाचा सण जवळ आला असून, केडगाव देवी मंदिर परिसरात दर्शनासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापौर ज्योतीताई गाडे व मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केडगाव देवी परिसराची पाहणी केली. यावेळी स्वच्छता, पाणी, विद्युत व्यवस्था, रस्त्यांचे पॅचिंग, मोकाट कुत्रे, जनावरे, अतिक्रमणे आदी विविध बाबींचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर, नगरसेविका कमल कोतकर, नगरसेविका अश्विनी लोंढे यांच्यासह इंजिनिअर महादेव काकडे, श्रीकांत निंबाळकर, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, विद्युत विभाग प्रमुख शांताराम क्षेत्रे आदी उपस्थित होते.

महापौर ज्योतीताई गाडे म्हणाल्या की, केडगाव देवी हे भाविकांचे श्रद्धास्थान असून नवरात्रोत्सवात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या काळात भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध सुविधा व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने आज परिसराची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे