श्री भावना ऋषी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकारी व सदस्य 25 सत्कार मूर्ती माता-पितांचे सत्कार करण्यात आले.
पुणे
काल दिनांक 4/10/2026 रोजी कार्यक्रमाच्या सुरवातीस सौं व श्री. राजेंद्र बासा यांनी गणेश वंदना सादर केले.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वल करून प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रभाकर जिंदम यांनी केले.
आंतरराष्ट्रीय जागतिक दिनानिमित्त श्री मार्कंडेय पुत्र श्री भावना ऋषी वंशज पद्मशाली सुपुत्र व सुकन्यांचे भावना ऋषि संघातर्फे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री. नरसय्या मिठापेल्ली, प्रसिद्ध उद्योजक, सौ शिला मिठापेल्ली, व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री रामचंद्रजी आडेपवार, उद्योजक, मे. पल्लवी रबर प्रॉडक्ट प्रा. ली .यांच्या शुभहस्ते एकूण 40 पैकी उपस्थित असलेल्या 25 सत्कार मूर्ती माता-पितांचे सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आले.
सदर कार्यक्रमास पदमशाली पंच कमिटीचे अध्यक्ष मा.श्री. संजीव मंचे व पद्मशाली धर्मशाळा पंढरपूरचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांतजी मिठापेल्ली, विश्वस्त श्री. मनीष अंदे, पद्मशाली प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री विजयजी रच्चेवार, ऍड. श्री. रमेश अंकम व सौं. श्री. प्रमोद पुट्टा हे देखील आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली .
श्री नागनाथ म्याना पंतुला यांनी तेलगू भाषेत रामायण मधील काही राम व भरत बंधू भेटीचे प्रसंग सादर केले. या सर्वांचे मनःपूर्वक आभार कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व बंधु-भगिनींचे तसेच श्री भावना ऋषी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी,सदस्य व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
मा श्री.मुत्यालसर यांनी उत्कृष्ट सूत्र संचालन केले.सर्व पदाधिकारी व सदस्यांचा परिचय करून दिला. प्रत्येक सत्कार मूर्तिचे वर्णन व जुन्या आठवणीचा परिचय देऊन सन्मान करताना माता- पितांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते.श्री.दत्तात्रय कुंदेन, संचालक* यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. श्री अंबादास* *सामलेटी, सचिव यांनी* उपस्थितांचे व ज्यांनी कार्यक्रमांस सहकार्य केले त्यांचे आभार मानले.श्री.सदाशिव मेरगू, व श्री. दत्तात्रय कुंदेन यांनी पसायधन म्हणून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर करणेत आले..
असेच श्री भावना ऋषी ज्येष्ठ नागरिक संघ पुणे च्या कार्यक्रमास सर्वांनी असेच यापुढे देखील सहकार्य करावे ही श्री मार्कंडेय चरणी व ईश्वरचरणी प्रार्थना करतो.




