ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

आम आदमी पार्टीच्या अहिल्यानगर शहर उपाध्यक्षपदी प्रशांत अरविंद दरेकर यांची नियुक्ती

अहिल्यानगर शहरात ‘केजरीवाल मॉडेल’ राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार – प्रशांत दरेकर

आम आदमी पार्टीच्या अहिल्यानगर शहरातील संघटनात्मक बांधणीला बळ देण्याच्या दृष्टीने प्रशांत अरविंद दरेकर यांची पक्षाच्या अहिल्यानगर शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी आयोजित ‘केजरीवाल मॉडेल’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

या नियुक्तीमुळे अहिल्यानगर शहरात आम आदमी पार्टीच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील नागरी प्रश्न, मूलभूत सुविधांचा अभाव, अस्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

“अहिल्यानगरला स्वच्छ, सुशिक्षित, आरोग्यदायी आणि मूलभूत सुविधांनी सक्षम शहर बनविण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने सातत्यपूर्ण प्रयत्न करू. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठविण्यासोबतच त्या प्रश्नांवर व्यावहारिक उपाय शोधण्याला आमचे प्राधान्य असेल,” असेही प्रशांत दरेकर यांनी सांगितले.

या वेळी पक्षाचे वरिष्ठ श्री जासमीन शाह, मा आ प्रकाशजी जरवाल, महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ अभिजीत मोरे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र आघाव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे