ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

जामखेड मध्ये प्रितम आशोक खाडे तलाठ्याला खंडणीची मागणी

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील नान्नजचे तलाठी प्रितम आशोक खाडे यांच्याकडे दरमहा पाच हजार रुपये, तर संदीप नानाजी भवाळ यांच्याकडे घरे पाडायची नसतील तर प्रत्येकी एक लाख रुपये मागितल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

तलाठी खाडे यांच्या फिर्यादीनुसार, 19 ऑगस्ट रोजी महादेव अरुण साठे, विशाल साठे, अलोक राजू साठे व आकाश राजू साठे (सर्व रा. नान्नज) यांनी कार्यालयात येऊन दरमहा पाच हजार रुपये मागितले. नकार दिल्यावर शिवीगाळ करून माहिती अधिकाराचे अर्ज व खोटा अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

महादेव साठे याने कोयता दाखवून धमकावल्याने पाच हजार रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी शासकीय कागदपत्रे फेकून कामात अडथळा आणल्याचाही आरोप आहे.

संदीप नानाजी भवाळ (62, रा. अण्णाभाऊ साठेनगर, नान्नज) यांच्या फिर्यादीनुसार, महादेव अरुण साठे, भाऊसाहेब साहेबराव साठे, संदीप बाबुराव साठे व गौतम भिकाजी साठे (सर्व रा. नान्नज) यांनी 17 व 21 ऑगस्ट रोजी समाज मंदिराच्या जागेतील घरे पाडण्याची धमकी दिली.

घरे पाडायची नसतील तर प्रत्येकी एक लाख रुपये द्यावेत, तसेच जेसीबी आणून घरे पाडण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित मोरे व पोलिस हवालदार टी.बी. सोनवणे करीत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे