ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

हॉटेलच्या उद्घाटनासाठी बोलावून महिलेवर अत्याचार

हॉटेलच्या उद्घाटनासाठी बोलावून महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा तसेच फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप आहे.

महिलेच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी किसन महादेव आव्हाड (रा. जांभळी, ता. पाथर्डी, सध्या रा. पाथर्डी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादी महिला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया परिचारिका असून, दोन-तीन वर्षांपूर्वी तिची आव्हाड याच्याशी ओळख झाली होती. 22 फेब्रुवारी रोजी हॉटेलच्या उद्घाटनासाठी तिला बोलावून आव्हाड याने कारमधून हॉटेलवर नेले.

कार्यक्रमानंतर इतर लोक निघून गेल्यावर हॉटेलचे शटर बंद करून धमकावत अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला.

फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने फिर्यादीत नमूद केले. मार्च 2026 च्या पहिल्या आठवड्यात पुन्हा फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला.

भीतीपोटी यापूर्वी कोणालाही माहिती दिली नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तिच्या जबाबावरून पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे