ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात पोलिसांचा रूट मार्च, समाजकंटकांवर तडीपारीची कारवाई

अहिल्यानगर

येत्‍या काही दिवसांवर येऊन ठेपलेले विविध धर्मीय सण व उत्सव शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेच्या वातावरणात पार पडावेत, यासाठी अहिल्यानगर शहर पोलिस दल पूर्णपणे सतर्क झाले आहे.

शनिवारी (दि.२२) अहिल्‍यानगर शहरात ‘दंगा काबू’ योजनेची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्यासोबतच प्रमुख मार्गांवरून दणदणीत रूट मार्च काढण्यात आला.

अहिल्‍यानगर शहरात येत्‍या काही दिवसांत धार्मिक व सांस्कृतिक उत्सव साजरे होणार आहेत. या सर्व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीने पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका व अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबरमे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, कोतवाली पोलिस स्टेशन, तोफखाना पोलिस स्टेशन व भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी विशेष सराव मोहीम राबवण्यात आली.

नगर पोलिस मुख्यालय आणि दिल्ली गेट परिसरात ‘दंगा काबू’ योजनेची रंगीत तालीम पार पडली. या दरम्यान दिल्ली गेट येथे अचानक दंगल किंवा अनुचित प्रकार घडल्यास परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवावे, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यादरम्यान दारूगोळा उडवून आणि अश्रूधुराचा वापर करून परिस्थिती हाताळण्याचा पोलीस दलाने प्रत्यक्ष सराव केला आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे