ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

‘तात्काळ परवाना निलंबना’च्या निकषांबाबत पारदर्शकता द्या- अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदन.

सुधारणा नोटीस न देता होणाऱ्या कारवाईवर प्रश्नचिन्ह.. स्पष्ट मार्गदर्शक सूचना व परिपत्रक काढण्याची मागणी.

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्न व्यवसायिकांच्या तपासणीदरम्यान आढळणाऱ्या त्रुटींवर तात्काळ प्रभावाने परवाना निलंबित करण्याच्या कारवाईबाबत कायदेशीर तरतुदी स्पष्ट कराव्यात, तसेच अशा कारवाईसाठी निश्चित निकष व मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी मागणी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयीन प्रकरणांचा संदर्भ देत अशा कारवायांची कायदेशीरता आणि प्रशासनाच्या प्रक्रियेचे पुनरावलोकन करण्याची गरज असल्याचे निवेदनकर्त्यांनी नमूद केले आहे.

जनतेच्या आरोग्याशी तडजोड होता कामा नये, तसेच गंभीर स्वरूपाचे अन्नसुरक्षा उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे. मात्र, किरकोळ अथवा सुधारणा करून दूर करता येणाऱ्या त्रुटी आणि जनतेच्या आरोग्यास तातडीचा धोका निर्माण करणाऱ्या गंभीर प्रकरणांमध्ये स्पष्ट फरक करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

“प्रशासन निश्चितच प्रभावीपणे काम करत आहे; मात्र प्रभावी कारवाईला कायदेशीर प्रक्रियेची जोड मिळणे आवश्यक आहे. नियमांच्या चौकटीत केलेली कारवाईच दीर्घकाळ टिकते आणि त्यातूनच जनहिताचा उद्देश साध्य होतो,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित मंत्री, मुख्य सचिव तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या प्रधान सचिवांकडे देऊन या विषयावर बैठक घेऊन योग्य निर्णय करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी केली आहे.

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे