ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सावेडीत क्षुल्लक कारणातून बेदम मारहाण कारवाईसाठी संघटना आक्रमक – पत्रकार सुशील थोरात यांच्यावर हल्ला..

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील साम टीव्ही न्यूज वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी सुशील थोरात यांच्यावर १५ ते २० जणांच्या टोळक्याने क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना अहिल्यानगरमध्ये घडली.

सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवर एचडीएफसी बँकेजवळ हा प्रकार घडला. या हल्ल्यानंतर थोरात यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच शहरातील पत्रकारांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. शहर विभागाचे उपअधीक्षक दिलीप टिपरसे आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी वैद्य यांनी रुग्णालयात धाव घेत घटनेची माहिती घेतली. दरम्यान, मारहाण करणाऱ्या काही संशयितांची नावे पोलिसांना समजली आहेत.

थोरात यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी पत्रकार पदाधिकारी आणि सदस्य जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाईची मागणी करणार आहेत.

विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकत्यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत शहरातील वाढत्या गुंडगिरीवर पोलिसांनी जरब बसवावी, अशी मागणी केली आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे