ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये धार्मिक यात्रेच्या नावाखाली जेष्ठ नागरिक आणि महिलांची लाखोंची फसवणूक

बनावट टूर्स आणि ट्रॅव्हल्सची फसवणूक..

आजकाल जो ऊठ सुठ या व्यवसायात उतरले आहेत.. कारण यात पैसा लगेच मिळतो..अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना वैष्णोदेवी व अमरनाथ यात्रेचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

वडगाव गुप्ता येथील दिनेश पोपट भोर याने ‘बाबा अमरनाथ टूर अँड ट्रॅव्हल्स’च्या माध्यमातून धार्मिक सहलीसाठी हेलिकॉप्टरसह विविध सुविधा देण्याचे आश्वासन देत स्मिता अनिल शितोळे आणि त्यांच्या परिचयातील भाविकांकडून एकूण २ लाख ५६ हजार रुपये गोळा केले.

पैसे घेतल्यानंतर हवामान खराब असल्याचे आणि हेलिकॉप्टर सेवा बंद असल्याचे कारण सांगून त्याने सहल रद्द केली तसेच पैसेही परत केले नाहीत.

चौकशीत त्याच्याकडे अधिकृत ट्रॅव्हल्स परवाना नसल्याचे समोर आले. याप्रकरणी १० जून रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलांनो सतर्क राहा ज्यांच्या कडे लायसन्स आहे अशा खात्रीशीर कंपनी सोबत च प्रवास करा..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे