ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर – पुणे महामार्गावरील हॉटेलवर पोलिस पथकाचा छापा, ४ पिडीत महिलांची सुटका….

नगर – पुणे महामार्गावरील हॉटेल मध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या (एएचटीयु) पथकाने छापा टाकत ४ पिडीत महिलांची सुटका केली आहे. या महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या हॉटेल चालकासह दोघांवर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पो.नि. रविंद्र देशमुख यांना ३१ मार्च रोजी नगर पुणे रोडवरील जातेगाव (ता.पारनेर) शिवारात हॉटेल जयराज येथे वेश्या व्यवसायाकरिता महिलांना रूम उपलब्ध करून देवून त्यांचेकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे पो.नि. देशमुख यांनी नियंत्रण कक्षातील पो.नि. हमीद शेख यांच्या सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार पो.नि. हमीद शेख यांनी पथकासह जावून पंचांसमक्ष बनावट ग्राहक पाठवून खात्री करून हॉटेल जयराज येथे जावून छापा टाकला असता सदर ठिकाणी कलंदर सत्तारअली शेख (रा. वडू रोड, कोरेगाव भिमा, ता. शिरूर जि. पुणे), हनुमंत अशोक देटके (रा. नागटापी, सासपडी, ता.जि. सातारा) हे दोघे मिळून आले. तसेच सदर ठिकाणी असलेल्या रूमची झडती घेतली असता सदर ठिकाणी रूममध्ये ४ महिला मिळून आल्या.

सदर महिलांची सुटका करण्यात आलेली असून दोघा आरोपींना ताब्यात घेवून आरोपी व पिडीत महिला यांना सुपा पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले. दोघा आरोपींवर सुपा पोलीस स्टेशन येथे स्रिया व मुली यांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५, ७, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधिक्षक गणेश उगले, पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हमीद शेख, स.फौ. शकील शेख, महिला पो.हे.कॉ. अर्चना काळे, अनिता पवार, चालक पो.कॉ. एस.एस. काळे यांच्या पथकाने केली आहे.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे