ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

महिलांकडे एकटक पाहिले, जिम ट्रेनरला बेदम मारहाण

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील जिममध्ये व्यायाम करण्यासाठी येणार्‍या महिलांकडे एकटक पाहिल्याचा जाब विचारल्यामुळे एका जिम ट्रेनरला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना शहरात घडली आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस दलातील अंकुश जाधव आणि विवेक आहिरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी सदाम हुसेन इद्रीस शेख हे कोहिनूर मॉल येथील एका जिममध्ये व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जिममध्ये येणार्‍या काही महिला सदस्यांनी आरोपींच्या वर्तनाबाबत तक्रार केली होती. यावरून शेख यांनी अंकुश जाधव याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने वर्दीचा माज दाखवत शेख यांना खोटी कारवाई करण्याची धमकी दिली.

३१ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास शेख हे कोठला चौक परिसरात गेले असता, आरोपींनी त्यांना अडवले. ओळखीचा फायदा घेऊन त्यांना चारचाकी वाहनात बसण्यास सांगितले आणि तिथेच अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे नेऊन दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पीडित तरुण तेथून सुटून जात असताना पुन्हा नटराज हॉटेलसमोर त्याला अडवून मारहाण करण्यात आली.

महिलांच्या सन्मानासाठी आवाज उठवणार्‍या जिम ट्रेनरवरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला आहे.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे