एका ६० वर्षीय ज्येष्ठाला त्यांच्या कुटुंबाला जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण
अहिल्यानगर

नागापूर परिसरातील कृष्णाई निवास भागात राहणार्या एका ६० वर्षीय ज्येष्ठाला आणि त्यांच्या कुटुंबाला जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका तरुणासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रमेश नाथाजी आणि त्यांचे कुटुंबीय घरात असताना आरोपी रूपाली विकी जगधने, दिपाली कांबळे आणि आकाश कांबळे तिथे आले. यावेळी रूपाली जगधने हिने फिर्यादीच्या मुलीमुळे संसार मोडल्याचा आरोप करत वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी फिर्यादीच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याच दरम्यान आकाश कांबळे याने आपल्या हातातील लाकडी काठीने रमेश नाथाजी यांच्या कपाळावर जोरात प्रहार करून त्यांना जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी आणि मुलालाही आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबाने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.




