ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर एमआयडीसीत तरुणावर कोयत्याने हल्ला करून अपहरण

अहिल्यानगर

अहिल्यानगर  एमआयडीसी भागातील क्रॉम्प्टन कंपनीसमोर भरदुपारी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अक्षय दत्तात्रय गवळी (वय २९, रा. नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास प्रवीण ज्ञानदेव मोरे हा तरुण राजामाणूस एंटरप्राइजेस जवळ असताना, आरोपी संजय ठोंबरे (रा. आदर्शनगर), सत्यम कासार, आलोक चारोडे (दोघे रा. अस्तगाव, ता. पारनेर) आणि एका अनोळखी इसमाने संगनमत करून त्याच्यावर हल्ला केला.

आरोपींनी प्रवीणला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या ताब्यातील चारचाकी गाडीने (एमएच १६ डीसी ६६९१) जोराची धडक दिली.या अपघातानंतर आरोपींनी प्रवीणवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवीणला आरोपींनी जबरदस्तीने गाडीत टाकून पळवून नेले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे