ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

ग्रंथपाल डॉ. चैतन्य वीर यांचा ‘चीफ एज्युकेशन आयकॉन 2026’ पुरस्काराने गौरव

मुंबई

संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, वसई येथील ग्रंथपाल डॉ. चैतन्य वीर यांना ग्रंथालयआणि माहिती शास्त्रातील त्यांच्या अमूल्य आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल छत्रपती हायर एज्युकेशन इंटलेकच्युअल फोरम चीफ यांच्या वतीने ‘चीफ एज्युकेशन आयकॉन 2026 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

दादर, मुंबई येथील शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात मा. खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी छत्रपती उच्च शिक्षण बौद्धिक मंचाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाटील, सचिव डॉ. माधव माने, खजिनदार डॉ. कागदे आणि अन्य शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. वीर यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविणे, संशोधनासाठी आवश्यक ऑनलाईन माहिती सेवा उपलब्ध करून देणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रंथालय सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी डॉ. वीर म्हणाले की, ‘हा सन्मान केवळ माझा नसून संत गोन्सालो गार्सियामहाविद्यालय, माझे सर्व सहकारी, विद्यार्थी, वाचन कट्ट्याचे विद्यार्थी आणि माझ्या कुटुंबाच्या प्रेरणेचे हे फलित आहे. या पुरस्कारामुळे वाचकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मला मिळाली आहे’.

या बहुमानाबद्दल एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे नॉलेज रिसोर्स सेंटर संचालक डॉ. सुभाष चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे नॉलेज रिसोर्स सेंटर चे संचालक डॉ. नंदकुमार मोतेवार आणि ग्रंथालय आणि माहिती शास्त्रातील तज्ञ आणि ग्रंथपाल यांनी अभिनंदन केले.

तसेच वसई धर्म प्रांताचे बिशप थॉमस डिसूजा, महाविद्यालयाचे मॅनेजर डॉ.जॉन फार्गोस, प्रशासक फादर डॉ. अनिल परेरा, प्राचार्य डॉ.सोमनाथ विभुते, उप-प्राचार्य सरिता कुरियन, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे