ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

क्रिकेटच्या वादातून हाणामारी , चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर

क्रिकेटच्या वादातून भातोडीत हाणामारी

अहिल्यानगर तालुयातील भातोडी गावात क्रिकेटच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले आहे. या घटनेत लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला असून, हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. जुन्या वादाची कुरापत काढून आरोपी शकील बबलू सय्यद, दगडू अब्दुलरहेमान शेख, फिरोज नजीर सय्यद आणि अरमान फिरोज सय्यद (सर्व राहणार भातोडी) हे हातामध्ये लाकडी दांडके, लोखंडी पाईप आणि रॉड घेऊन आले.

त्यांनी फिर्यादीच्या नातेवाईकाने क्रिकेट स्पर्धेच्या वेळी केलेल्या वादाचा आणि मोबाईल फोनवर संपर्क साधल्याचा जाब विचारला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला धमकावले.

वादाचे स्वरूप वाढल्याने आरोपींनी हातातील शस्त्रांनी बेदम मारहाण सुरू केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या हाताच्या बोटावर लोखंडी रॉडचा जोरात फटका बसल्याने त्यांचे बोट मोडले असून गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार लोखंडे करत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे