ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पोलिस कोठडीतील महिलेकडे शरीरसुखाची मागणी

10 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या एका महिला आरोपीकडे, कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने ‘शरीरसुखाची’ मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या घटनेमुळे अकोला पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला .

नोकरी लावण्याच्या बहाण्याने ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित महिलेला सायबर पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

कोठडी दरम्यान महिलेला अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. कोठडीत असताना तेथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याने आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली, असा खळबळजनक दावा आरोपी महिलेने लेडी पोलीस कर्मचाऱ्याकडे केला.

ही बाब संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने तातडीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. आपल्याच विभागातील एका अधिकाऱ्याने असे नीच कृत्य केल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा पारा चढला. माहिती मिळताच वरिष्ठांनी थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले आणि तेथील संबंधित पोलीस एएसआय राजेश जाधवची चांगलीच कानउघडणी करत त्याला सर्वांसमोर झापले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे