ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कट्टर हिंदुत्व बाळगणाऱ्या दहा भाजप उभ्या करू शकतो – अभिनेते शरद पोंक्षे

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित तीन दिवसीय रामस्मरण व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफतांना ‘भारत एक हिंदू राष्ट्र’ या विषयावर ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे बोलत होते. रेशीमबाग येथील महर्ष व्यास सभागृहात हा कार्यक्रम झाला.

आज भारतामध्ये हिंदूंचे सण, उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जात आहेत. ‘गर्वाने म्हणा आम्ही हिंदू आहोत’, असे म्हणण्याची ताकद केवळ केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आहे. याचे संपूर्ण श्रेय मोदींसोबत संघाला जाते. शंभर वर्षात अनेक उपेक्षा सहन करूनही संघ आज ताठ उभा आहे. संघ ही भाजपची आली आहे.

मात्र, भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर अशा दहा भाजप संघ उभा करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे. पुन्हा दहा-पंधरा वर्षे वाट पाहावी लागली तरी चालेल. पण, कट्टर हिंदूच्या दहा भाजप उभ्या करण्याची ताकद संघात आहे, असेही शरद पोंक्षे म्हणाले.

स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे.

जोपर्यंत हिंदू समाज संघटित होऊन स्वतःच्या हक्कांप्रती पूर्णपणे जागृत होत नाही, तोपर्यंत हिंदूंचे प्रभावी एकत्रीकरण होणार नाही. भारत हिंदू राष्ट्र होता, आहे आणि राहीलच. मात्र आता प्रत्यक्ष अधिकृतरित्या भारत ‘हिंदू राष्ट्र’ घोषित व्हायला हवा, असेही शरद पोंक्षे म्हणाले.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे