ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरमधील केडगाव येथील घटना – भविष्य सांगण्याच्या बहाण्याने नागरिकाला लुटले

अहिल्यानगर मधील केडगाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसलेल्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला भविष्य सांगण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी लंपास केली.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष चंद्रसेन गायकवाड (वय ६८, रा. समतानगर, केडगाव) हे शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास केडगाव वेस परिसरात बसले होते.

यावेळी दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने ’मी खूप मोठा ज्योतिषी आहे, तुमचे भविष्य पाहतो’ असे सांगून गायकवाड यांचा विश्वास संपादन केला.

एका दगडाचा रुद्राक्ष करून दाखवत भामट्यांनी त्यांना भुरळ घातली. त्यानंतर ’भविष्य पाहण्यासाठी बोटातील अंगठी २० रुपयांच्या नोटेत गुंडाळून ठेवा’ असे त्यांना सांगण्यात आले.

गायकवाड यांनी विश्वासाने ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून दिली. आरोपीने सदर अंगठी नोटेत गुंडाळून त्यांच्या शर्टाच्या खिशात टाकल्याचा बनाव केला. काही वेळाने दोन्ही आरोपी तेथून पसार झाले.

संशय आल्याने गायकवाड यांनी खिशाची तपासणी केली असता, त्यात अंगठी आणि २० रुपयांची नोट मिळून आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते.

फिर्यादीनुसार, एक आरोपी ३५ वर्षांचा असून त्याने पांढरा शर्ट घातला होता, तर दुसरा २५ ते ३० वयोगटातील आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे