ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

२ मे पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी, सुरू कधी होणार? सरकारने आदेश काढला

अहिल्यानगर

राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांमध्ये २ मेपासून विद्यार्थ्यांना अधिकृतपणे उन्हाळी सुट्टी लागू होईल. इतर मंडळांच्या काही शाळांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार किंवा शैक्षणिक उपक्रमांमुळे शाळा सुरू असल्यास, संबंधित शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालयाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले.

यंदा शिक्षण विभागाने हा अपवाद रद्द करत राज्यभर एकसमान वेळापत्रक लागू केले आहे. विदर्भासह सर्व विभागांतील शाळा १५ जूनपासूनच सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. सर्व विभागांतील शाळांनी याच तारखेपासून नियमित अध्यापनास प्रारंभ करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

जूनमधील वाढत्या तापमानाचा विचार करून, शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत केवळ विदर्भातील शाळा सकाळी ७ ते ११.४५ या वेळेतच भरवण्यात याव्यात, असेही आदेश देण्यात आले आहेत.

हा बदल १५ जून ते २७ जून या कालावधीत लागू राहील. त्यानंतर ३० जूनपासून या शाळा नियमित वेळेनुसार सुरू करण्यात येणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे