ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

जामखेड येथील सराफ व्यावसायिकाला 13 लाख 80 हजाराचा गंडा घातल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरसह दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

अहिल्यानगर

जामखेड येथील सराफ व्यावसायिकाला 13 लाख 80 हजाराचा गंडा घातल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरसह दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून तीन आरोपींपैकी एकास अटक केली. त्याला रविवारी(दि.29) जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमोल विलास चिंतामणी (वय 49, रा. कोर्ट रोड, जामखेड) यांचे वैशाली ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दि. 17 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारास आप्पासाहेब ज्ञानदेव देवकाते (रा. काटेवाडी) हा त्यांच्या दुकानात आला. त्याने आपला मित्र धम्मसागर हिरालाल समुद्र (रा. सारोळा) याने आयसीआयसीआय बँकेत घेतलेले गोल्ड लोन सोडवण्यासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून चिंतामणी यांनी 13 लाख 80 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. मात्र, संबंधित रक्कम परत न करता आरोपींनी फसवणूक केल्याचे समोर आले.

या प्रकरणात आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही) यांनीही संगनमत करून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या गुन्ह्याचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे हे करत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे