ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

व्यावसायिकाला मारहाण एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर

मनमाड रस्त्यावरील विळद (ता. अहिल्यानगर) शिवारातील नर्सरी जवळ वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून व्यावसायिकाला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

व्यावसायिक बाळासाहेब सुरेशराव जगताप (वय 59) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (26 जानेवारी) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सचिन बाबासाहेब गिते (रा. धारवाडी, ता. पाथर्डी), महादेव किसन बडे (रा. जागेवाडी, ता. पाथर्डी), संजय परसराम पवार (रा. पारगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून सचिन गिते व महादेव बडे यांनी जगताप यांना अडवले. त्यानंतर त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली.याच दरम्यान त्या ठिकाणी खासगी बसचा चालक संजय पवार हा देखील आला.

या तिन्ही संशयित आरोपींनी संगनमत करून फिर्यादी जगताप यांना जमिनीवर पाडले आणि लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर, तुला गाडीखाली घालून ठार मारू अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेत बाळासाहेब जगताप जखमी झाले असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार थोरात करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे