ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सॊने खरेदीच्या बहाण्याने सराफास घातला साडेतीन लाखांचा गंडा

अहमदनगर

दागिने खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात आलेल्या एका अनोळखी इसमाने सराफ व्यावसायिकाला दागिने दाखवायला सांगितले अन त्यांना बोलण्यात गुंतवून ३ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेवून तेथून पोबारा करत, तब्बल साडेतीन लाखांना गंडा घातला. ही घटना बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा येथे असलेल्या दहीवळ ज्वेलर्स या सराफी दुकानात रविवारी (दि.३०) सकाळी ९.४५ च्या सुमारास घडली.

याबाबत शशिकांत भगवान दहीवळ (वय ६२, रा. सुडके मळा, बालिकाश्रम रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दहीवळ यांचे बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा येथे दहीवळ ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे.

रविवारी सकाळी त्यांनी दुकान उघडले व त्यातील रॅक मध्ये सोन्याचे दागिने लावत असताना ९.४५ च्या सुमारास एक काळ्या रंगाचे हेल्मेट घातलेला इसम दुकानात आला. त्याने फिर्यादी दहीवळ यांना सोन्याचे दागिने दाखवायला सांगितले. त्यांनी त्यास विविध प्रकारचे दागिने दाखवले. ते दागिने दुकानाच्या काऊंटर ठेवलेले होते.

त्या इसमाने आणखी दागिने दाखवायला सांगितले. फिर्यादी दहीवळ हे रॅक मधून आणखी दागिने काढायला गेले असता त्या इसमाने दुकानाच्या काऊंटर ठेवलेले ३ लाख ४८ हजार किमतीचे सोन्याचे दागिने तेथून पोबारा केला.

दहीवळ यांच्या निदर्शनास ही आल्यावर ते दुकानाच्या आले, परंतु तो पर्यंत तो तेथून पसार झाला होता. माहिती त्यांनी पोलिसांना कळविली. ही माहिती मिळताच शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट पाहणी केली. या प्रकरणी दहिवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनोळखी चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे