ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी एक मल्टीस्टेट पतसंस्था अडचणीत, ठेवीदारांचे अडकले 5.63 कोटी

अहिल्यानगर

भगवानबाबा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेत 49 ठेवीदारांच्या 5 कोटी 63 लाख 49 हजार 764 रुपयांच्या ठेवी अडकल्या असून या ठेवींची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने संस्थेच्या संचालक मंडळावर 26 नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत ठेवीदार सौ.निकिता सचिन पवार (रा.केसापूर, ता.राहुरी) यांनी फिर्याद दिली. भगवानबाबा मल्टिस्टेटच्या नगर शहरासह शेवगाव, श्रीरामपूर, पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी, बोधेगाव येथे शाखा आहेत.

श्रीरामपूर शाखेत फिर्यादी निकिता पवार यांच्या पतीच्या नावे सन 2023 मध्ये 2 कोटी 99 लाख 55 हजार रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. या ठेवींची मुदत संपल्यावर आणि फिर्यादी यांच्या कुटुंबीयांना पैशांची आवश्यकता असल्याने त्या संस्थेत ठेवी आणि त्यावरील व्याजाची रक्कम मागण्यासाठी गेल्या असता ठेवी परत करण्यास टाळाटाळ सुरू करण्यात आली.

पवार यांनी संस्थेच्या चेअरमनसह संचालक मंडळाशी अनेक वेळा संपर्क साधून ठेवीच्या रकमेची मागणी केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. संस्थेकडून ठेवीची रक्कम तसेच व्याज मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता या शाखेत अजून इतर 48 ठेवीदारांच्या 2 कोटी 63 लाख 94 हजार 764 रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत.

अशा फिर्यादीसह 49 ठेवीदारांच्या 5 कोटी 63 लाख 49 हजार 764 रुपयांच्या ठेवी देण्यास संचालक मंडळाने टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी ठेवीदारांचे अर्ज, ठेवीच्या पावत्या व इतर कागदपत्रांची चौकशी केल्यावर सौ.निकिता पवार यांची फिर्याद नोंदवून घेत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संस्थेच्या चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, संचालक मयूर रंगनाथ वैद्य, नितीन सोपानराव तुपे, शांतीसिंग नागनाथ साखरे, राम लक्ष्मण पोपळघट, किशोर अनिल सुरवसे, वैशाली मयूर सुरवसे, व्यवस्थापक प्रवीण म्हसे या 8 जणांचा समावेश आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे