ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांना १ व २ डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे आदेश

अहिल्यानगर

अहिल्यानगर नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ अनुषंगाने जिल्ह्यातील ११ नगर परिषद व एका नगरपंचायतीमध्ये दि.२ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्र म्हणून नियुक्त सर्व शाळांना दि. १ व २ डिसेंबर २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.) यांनी काढले आहेत.

जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड व श्रीगोंदा नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायत मतदानाच्या पूर्वतयारीसाठी अधिकारी व कर्मचारी दि.१ डिसेंबर रोजीच मतदान केंद्रांवर दाखल होणार असल्याने संबंधित शाळा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे.

त्यामुळे दि.१ डिसेंबर रोजी व दि.२ डिसेंबर २०२५ मतदानाच्या दिवशी ह्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी ही सुट्टी घोषित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे