ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शासकीय कामात अडथळा तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर

अहिल्यानगर  मधील भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की करत त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.१२ वाजता ‘अजय ज्वलर्स’जवळील ग्रामीण गल्ली, भिंगार येथे घडली. आरोपींची नावे निलेश सुनिल पेंन्डुलकर, अजय सुरेश अंबीलवादे , प्रविण सुनिल पेंन्डुलकर अशी आहे. आरोपींच्या घरी सुरू असलेल्या घरगुती वादामुळे त्यांनी ‘डायल ११२’ वर कॉल करून मदत मागितली होती.

त्यानुसार पोलीस अंमलदार प्रमोद मधुकर लहारे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत असताना, आरोपींनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण झाला. पोकॉ प्रमोद लहारे यांच्या तक्रारीवरून कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे