ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बनावट इन्स्टाग्राम अकाउंटवरून महिलेची बदनामी, फोटो वापरून अश्लिल मेसेज

अहिल्यानगर

सोशल मीडियाचा वापर करून महिलांची बदनामी करण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसून, असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. शेवगाव तालुक्यातील एका गावात राहणार्‍या 30 वर्षीय महिलेचे फोटो चोरून, तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आले.

इतकेच नाही, तर त्यावरून अश्लिल मेसेजसह तिचा वैयक्तिक मोबाईल नंबर प्रसारित केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी, पीडित महिलेच्या फिर्यादीवरून येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरूध्द बुधवारी (12 नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या पूर्वी, अज्ञात आरोपीने मोबाईल क्रमांकचा वापर करून, पीडित महिलेच्या नावाने एक बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडले.

आरोपीने या बनावट अकाउंटवर फिर्यादी महिलेचे फोटो वापरले. तसेच, अश्लिल मेसेज पोस्ट केले. आरोपीने या बनावट प्रोफाईलवर अश्लिल शब्दप्रयोग करून, त्याखाली पीडित महिलेचा खरा मोबाईल क्रमांक टाकला.

हा सर्व प्रकार पीडित महिला व त्यांच्या कुटुंबाची समाजात बदनामी करण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे