ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सेंट विवेकानंद प्राइमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांत रुजवले नेतृत्वाचे धडे

अहिल्यानगर

नेतृत्व हे व्यवस्थापनाच्या अनेक तत्त्वांपैकी एक महत्त्वाचे तत्त्व आहे. कोणत्याही कार्याच्या अंमलबजावणीत नेतृत्वाची नितांत गरज असते. या नेतृत्वाची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावी आणि त्यातून भावी सुजाण आणि सुसंस्कृत नेतृत्व तयार व्हावे या दृष्टीने मुख्याध्यापिका सौ. कांचन पापडेजा यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट विवेकानंद प्राइमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या, विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. 

मुख्याध्यापिका सौ. कांचन पापडेजा, सौ.अश्विनी देशपांडे, सौ. चांदनी सोनग्रा व सौ करिश्मा शेख यांच्या परीक्षण समितीने अतिशय उत्कृष्ट पारदर्शकता ठेवून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली.

यात हेड बॉय बुरानुद्दीन कयूमी, हेड गर्ल स्वानंदी महाजन, क्लिनलिनेस कॅप्टन स्वरा धोत्रे व अमेय बोरले, आर्ट सेक्रेटरी रेवा बोज्जा व प्रणील थिगळे, इंग्लिश स्पीकिंग कॅप्टन झेनब शेख व समर्थ वारकड, डिसिप्लिन इन्चार्ज काव्या विद्ये व आर्यन लोखंडे यांचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांचे काही ग्रुप करण्यात आले. त्यांचे शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी देखील या प्रसंगी निवडण्यात आले. ते पुढील प्रमाणे आहेत..

ब्ल्यू बेल्स शिक्षिका – सौ प्रियंका चारगुंडी व सौ .प्रीती कटारिया, कॅप्टन्स रुद्रा खरात व आराध्य गोणे, पॅन्सीज ग्रुप शिक्षिका – सौ शुभांगी क्षीरसागर व अमरींदरकौर ग्रेवल, कॅप्टन्स – ओवी जाधव व शम्स सय्यद, रोझ ग्रुप शिक्षिका – सौ.पूजा चोपडा व सौ. अनामिका म्हस्के, कॅप्टन्स – सानवी पालवे व अर्णव पटेकर, सनफ्लाॅवर ग्रुप शिक्षिका सौ भावना ढाळे व सौ.चांदनी सोनग्रा, कॅप्टन्स – श्रीशा अजबे व अथर्व धर्माधिकारी.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. राम मेंघानी, उपाध्यक्ष श्री. रूपचंद मोटवानी, सचिव श्री. गोपाल भागवानी, खजिनदार श्री. दामोधर माखिजा, विश्वस्त श्री. महेश मध्यान, श्री. सुरेश हिरानंदानी, श्री. राजकुमार गुरुनानी, श्री. हरेष मध्यान तसेच माध्यमिक च्या प्राचार्या गीता तांबे व मुख्याध्यापिका सौ कांचन पापडेजा उपस्थित होत्या. त्यांनी सर्व नवनिर्वाचित कॅप्टनला बॅचेस लावून त्यांचे अभिनंदन केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. करिष्मा नवलानी, सौ. नम्रता कुकरेजा, सौ. मेधा कुलकर्णी, सौ. नयन तुपे, शुभांगी पाखरे, बाळासाहेब पठारे अनामिका म्हस्के तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे