ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरसेवक योगीराज गाडे यांच्या पुढाकाराने सावेडी उपनगरात मोफत आरोग्य शिबिर

अहिल्यानगर

नगरसेवक मा. योगीराज शशिकांत गाडे यांच्या पुढाकाराने आणि साईमाऊली हॉस्पिटल तसेच अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त सहकार्याने सावेडी उपनगरात भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आनंद विद्यालय, गुलमोहर रोड, अहिल्यानगर शहर येथे आयोजित केले जाणार आहे.

या शिबिरात खालील सर्व सेवा नागरिकांना पूर्णपणे मोफत मिळणार आहेत—

नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप

मोतीबिंदू शस्त्रक्रिया

गुडघेदुखी व सांधेदुखी तपासणी व निदान

सर्व रुग्णांची तपासणी व मोफत औषधोपचार

ही सुविधा अहिल्यानगर वॉर्ड क्र. ३ तसेच संपूर्ण सावेडी उपनगरातील नागरिकांसाठी खुली आहे.

या उपक्रमाचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा, असे आवाहन नगरसेवक मा. योगीराज गाडे यांनी केले आहे.

आपल्या निवेदनात नगरसेवक गाडे म्हणाले — “सामान्य नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण आणि त्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. नागरिकांच्या सोयीसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरेल.”

शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व तपासण्या व आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत.

आयोजक:- 

मा. योगीराज शशिकांत गाडे

नगरसेवक, म.न.पा. अहिल्यानगर

सहकार्य: – 

साईमाऊली हॉस्पिटल व अंजली चष्मावाला

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: ९६८९८९६९८२

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे