ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा

अहिल्यानगर

समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे कायम आपल्या भन्नाट किर्तनं आणि विनोदी शैलीसाठी चर्चेत असतात. समाजातील विविध विषयांवर जनजागृती करणारे इंदुरीकर महाराज यांची किर्तनं नेहमीच लोकांना विचार करायला लावतात.

नुकतंच त्यांच्या घरात एक आनंदाचं वातावरण होतं. कारण त्यांच्या लेकीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजेशाही मिरवणूक, पाहुण्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेलं कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी, बायकांनी धरलेला फेर चर्चेचा विषय ठरला. इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप या बांधकाम व्यावसायिकासोबत पार पडला.

हा सोहळा संगमनेरमध्ये अत्यंत सुंदर आणि पारंपरिक पद्धतीनं आयोजित करण्यात आला होता. सजावट, पोशाख आणि वातावरण यामुळे या साखरपुड्याला राजेशाही थाट लाभला. अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाला असून, अनेकांनी “इंदुरीकर महाराजांच्या घरातला आनंदाचा सोहळा” असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराज नेहमी आपल्या किर्तनातून साधेपणाचं महत्त्व सांगतात, पण या वेळी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या कुटुंबातील आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. लग्न साध्या पद्धतीनं करा असा संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनातून देत असतात.

माहितीनुसार, साहिल चिलाप हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून, उच्च शिक्षित आहेत. गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे आणि शहरात त्यांनी स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे.

इंदुरीकर महाराजांच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर चाहत्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे. महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षणही लोकांना प्रेरणा देणारे ठरत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे