ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सोलर पॅनल बसवण्याच्या नावाखाली नगर तालुक्यातील शेतकऱ्याची पावणेतीन लाखांची फसवणूक

अहिल्यानगर

‘प्रधानमंत्री सूर्य घर योजने’अंतर्गत सोलर पॅनल व सोलर पंप बसवून देण्याचे आमिष दाखवून, एका भामट्याने खातगाव टाकळी परिसरातील शेतकऱ्यांना तब्बल २ लाख ६७ हजार २०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी सैनिक विजय भानुदास जपे (वय ५२, रा. खातगाव टाकळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजेंद्र माधव बोऱ्हाडे (रा. आळेफाटा, जि. पुणे) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय जपे यांना घरावर सोलर प्लँट बसवायचा होता. त्यांनी आरोपी राजेंद्र बोऱ्हाडे याच्याशी संपर्क केला. बोऱ्हाडे याने आपण ‘APN सोलर कंपनी’ चा अधिकृत सब-डिलर असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला.

​फिर्यादी जपे यांनी २४ जानेवारी २०२५ रोजी बोऱ्हाडे याला १०,००० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. तसेच, इतर शेतकरी संदीप कुलट, नामदेव कळमकर, नारायण कुलट व किसन सातपुते यांनीही रोख स्वरूपात पैसे जमा केले. अशाप्रकारे आरोपीने एकूण २,६७,२०० रुपये गोळा केले.

​पैसे देऊन महिना उलटला तरी सोलर पॅनल किंवा पंप बसवले नाहीत. आरोपी बोऱ्हाडे याला फोन केल्यास तो ‘पुढील आठवड्यात बसवणार आहे’ असे सांगून वेळ मारून नेत होता. दरम्यान, याच आरोपीने राहुरी परिसरातही अशाच प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची व त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती फिर्यादी व इतर शेतकऱ्यांना मिळाली.

​आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विजय जपे यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. आरोपीने विश्वासघात करून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सपोनि चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सांगळे पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे