ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी

अहिल्यानगर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली आहे. बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असून बीडमधील एका बड्या नेत्याचा यामध्ये हात आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीसोबत बीडमध्ये बैठका झाल्या होत्या. मनोज जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी यासंदर्भात जालना पोलिस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहिती आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींना जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात स्वतः मनोज जरांगे पाटील हे देखील जालना पोलिस अधीक्षकांना रात्री उशिरा भेटल्याची माहिती आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे