ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

15 ऑगस्ट 2025 पासून नैतिक फाऊंडेशन अहिल्यानगर चा नवीन उपक्रम – श्री प्रशांत अरविंद दरेकर यांच्या पुढाकारातून कचरा मुक्त शहर …

अहिल्यानगर

कचरा मुक्त शहर बनवण्यासाठी कचर्‍याचे संकलन व योग्य पद्धतीने निचरा होणे आवश्यक आहे. ही जबाबदारी फक्त पालिकेची नसून एक सुजाण नागरिक म्हणून आपली देखील कर्तव्य आहे. त्यासाठी घरगुती ओला कचरा निचरा करून त्यापासून स्वयंपाकासाठी उपयुक्त असा बायोगॅस तयार करता येऊ शकतो.

या संकल्पनेतून जनजागृती करण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 पासून श्री प्रशांत अरविंद दरेकर व नैतिक फाऊंडेशन, अहिल्यानगर यांच्या मार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत दैनंदिन कचरा गाडी पाठवून वर्गीकृत केलेला कचरा गोळा करणे व त्यापासुन घरगुती उपयोगासाठी बायोगॅस तयार करणे, हे कार्य या अभियानात करण्यात येणार आहे.

जनजागृती करून अशा प्रकारे घरातील कचरा घरातच निचरा करणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रत्यक्षात ही संकल्पना राबवून घरोघरी कचरा व्यवस्थापन प्रणाली राबवणे हा नैतिक फाऊंडेशन, अहिल्यानगर यांचा या अभियाना मागचा मुळ उद्देश आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे