ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नवीन इन्कम टॅक्स बिल मंजूर, तुमच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार ?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत नवीन आयकर विधेयक सादर केलं असून या नवीन आयकर विधेयकात काही बदल करण्यात आले आहेत. नवीन आयकर विधेयकानुसार, करदात्यांच्या आयटीआर भरण्याच्या प्रोसेसमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सरकारने मागील आठवड्यात आयकर विधेयक मागे घेतले होते.

वैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने 13 फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केलेल्या आयकर विधेयकात काही बदल सुचवण्यात आले होते. त्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत. यामधून 60 वर्षे जुना Income Tax Act, 1961 बदलण्यात आला आहे.

नवीन आयकर विधेयकामुळे टॅक्स भरण्याची प्रोसेस अधिक सोपी होईल. आधीच्या कायद्यातील त्रुटी दूर केल्या जातील. टॅक्स प्रणालीत बदल होण्याची शक्ता आहे.

यामुळे करदाते MSME उद्योगांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. नव्या कायद्यामध्ये शून्य टीडीएस पर्याय देण्यात आला आहे. ज्यांच्याकडे कर दायित्व नाही त्यांना शून्य-टीडीएस प्रमाणपत्र मिळू शकेल.

मागील आयकर विधेयकात जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर फाइल केले नाही तर रिफंड मिळत नव्हता. आता ही अट काढून टाकण्यात आला आहे.

त्यामुळे आता तुम्ही जेव्हा आयटीआर फाइल कराल त्यानंतर तुम्हाला परतावा मिळणार आहे. नवीन आयकर विधेयकामुळे टॅक्स भरण्याची प्रोसेस अधिक सोपी होणार आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे