ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

उमेद सोशल फौंडेशन ,जिल्हा क्रीडा कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने साईराज नगर नवनागापुर अहिल्यानगर येथे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी

अहिल्यानगर

साईराज नगर नवनागापुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज तसेंच महात्मा जोतीबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ग्रामपंचायतचे सदस्य आप्पासाहेब सप्रे तसेंच सागर सप्रे हे होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.आप्पासाहेब सप्रे यांनी सर्वच महापुरुषांचे विचार हे डोक्यात घेऊन कार्य केले पाहिजे व शिक्षण घेतले पाहिजे असे सांगितले तसेंच सागर सप्रे यांनी उमेद फौंडेशन कडून महापुरुषांची जयंती साजरी केल्याने सर्व उमेद टीम चे कौतुक करून गावागावात सर्व महापुरुषाची जयंती साजरी केली पाहिजे असे सांगितले .

या कार्यक्रमाला उमेद फौंडेशन चे अध्यक्ष अनिल साळवे सचिव सचिन साळवी,सदस्य विजय लोंढे,रवी साखरे ,प्रकाश भालेराव् तसेंच जितेश कांबळे,सचिन विधाते,अविनाश विधाते,अशोक साळवे,अमोल वंजारी,मदन ढवळे,कारभारी ननवरे,साजिद शेख,संदीप चौधरी,रमेश पठारे,सोमनाथ चौधरी,सोमेश्वर सोमवंशी,महेश दळवी,सतीश पवार,नारायण दळवी,चंद्रकांत विधाते,वसंत दहाने,सखाराम कांबळे बोद्बाचार्य विशाखा विधाते आदी मान्यवर तसेंच मोठया संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमावेळी लहान मुलांचे भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले व सर्वांनी त्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसन्चालन अनिल साळवे यांनी केले व आभार चंद्रकांत विधाते यांनी मांडले कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे अयोजन केले होते.

या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिध्द्द् सोलनकर,क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरागे,नेहरू युवा केंद्राचे समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला,रमेश घाडगे,जय असोसिएशनचे ऍड.महेश शिंदे, उमेद चे उपाध्यक्ष कुणाल तनपुरे,सल्लागार ऍड.दीपक धिवर तसेंच खजिनदार संजय निर्मळ यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे