सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूरच्या विद्यार्थ्यांचे GPAT व NIPER-JEE 2025 मध्ये घवघवीत यश
शिरूर - ता. पुणे

श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथील विद्यार्थ्यांनी यंदाच्या GPAT (Graduate Pharmacy Aptitude Test) आणि NIPER-JEE 2025 (National Institute of Pharmaceutical Education and Research Joint Entrance Examination) या राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशस्वी कामगिरीमुळे संस्थेचे नाव उज्ज्वल झाले असून, विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने अभिमानास्पद स्थान मिळवले आहे.
या परीक्षांमध्ये कु. श्रेया भोसले हिने NIPER मध्ये AIR 532 (एम.एस. फार्म) व AIR 233 (एम. टेक) आणि GPAT मध्ये AIR 2418 असा घवघवीत क्रमांक पटकावला आहे. कु. श्रुती मोरे हिला NIPER मध्ये AIR 1061 (एम.एस. फार्म) व GPAT मध्ये AIR 1155 मिळाला. चि. जीवनराज चव्हाण याने GPAT मध्ये AIR 4507 प्राप्त केला आहे. तसेच कु. सुप्रिया मखरे हिला GPAT मध्ये AIR 3711, कु. मानसी थोरात हिला NIPER मध्ये AIR 820 (एम.एस. फार्म) व GPAT मध्ये AIR 1028, कु. ऋतुजा जाधे हिला AIR 1657, कु. साक्षी तोंडे हिला NIPER मध्ये AIR 1061 (एम.एस. फार्म) आणि GPAT मध्ये AIR 2916 आणि अम्मान शेख GPAT मध्ये AIR 4278 हा क्रमांक मिळाला आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल बी फार्मेसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सचिन कोठावदे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून, विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमासोबतच संस्थेतील प्रा. वर्गाचे वेळोवेळी झालेले मार्गदर्शन आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण या यशामागील मुख्य घटक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे, सचिव श्री. धनंजयजी थिटे, डॉ. हर्षवर्धनजी थिटे आणि संस्थेचे समन्वयक श्री. शिवाजीराव पडवळ यांनी या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





