ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगसामाजिक

दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन

अहिल्यानगर

नगर फटाका व्यवसायिक श्री.रामचंद्र मुलतानी यांचा माल नुकताच कोतवाली पोलिसांनी बेकायदेशीरपणे जप्त केला म्हणून दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने सर्व सभासदांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले .

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष गणेश परभणे, सेक्रेटरी श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष सुरेश जाधव व विकास पटवेकर, ज्येष्ठ सदस्य देविदास ढवळे, शिरीष चंगेडे, अनिल टकले, निखिल परभणे,अरविंद साठे,सोमा रोकडे, सागर जाधव, रमेश बनकर, दाजी गारकर,सागर हरबा, अरविंद काळे, मयूर भापकर, संजय जंजाळे,उबेद खान, आदिनाथ दारकुंडे, संजय सुराणा, अमोल तोडकर, सुनील पोपटाणी, विजय मुनोत, राजेंद्र छल्लाणी, उमेश क्षीरसागर, सुनील आरे,गोरख खंदारे, कराळे सह इतर सदस्य उपस्थित होते.

दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने व्यापारी सदस्य अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात फटाक्यांची विक्री करीत असतात व सदर फटाका माल हा वाहतुकीने अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जात असतो परंतु नुकतेच कोतवाली पोलिसांनी असोसिएशनचे जेष्ठ सदस्य रामचंद्र मुलतानी यांचा फटाका माल पिंपरी चिंचवड येथील ग्राहकासाठी वाहतूक केले जात असताना कारवाई करून माल जप्त केला. वास्तविक पाहता फटाका वाहतूक करण्यासाठी कोणतेही कायदेशीर परवाना लागत नाही असा भारत सरकारचा स्फोटक पदार्थ नियम 1983 पोटनियम 32(5) व 77(2) प्रमाणे फटाका वाहतूक करण्यास कोणत्याही कायदेशीर परवानगीची आवश्यकता लागत नाही .

असे जीआर असताना पोलिसांनी वाहतूक परवाना नसल्याने कायदेशीर कारवाई करणे व्यापाऱ्यावर अन्यायकारक आहे या पूर्वीही पोलीस प्रशासनातील काही मंडळी आर्थिक चिरीमिरी साठी व्यापाऱ्यांचे गाड्या अडवून त्रास दिलेला आहे व हा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे फटाका व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन असोसिएशन च्या वतीने पोलीस प्रशासनाने यापुढे व्यापाऱ्यांवर अशा पद्धतीने काही कारवाई करू नये म्हणून मा. जिल्हा पोलीस अधीक्षक यांची समक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले व त्याची प्रत मा. जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांना देण्यात आली आहे.

या वेळी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या पुढे व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही असे आश्वासन दिले व व्यापाऱ्यांनीही सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करण्याची ताकीद दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे