ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

दुरावस्थेमुळे बंद असलेले केडगाव भाग्योदय मंगल कार्यालय नागरिकांसाठी खुले होणार

अहिल्यानगर

आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगर महानगरपालिकेकडून केडगावात कार्यालय स्वच्छता अभियान..

दुरावस्थेमुळे बंद असलेले भाग्योदय मंगल कार्यालय नागरिकांसाठी खुले होणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालयाची दुरावस्था झाली आहे. कोविड काळापासून ते बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. आमदार संग्राम जगताप यांनी हे कार्यालय पुन्हा नागरिकांसाठी खुले होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी महानगरपालिकेने स्वच्छता अभियान राबवून हे कार्यालय स्वच्छ केले. तेथील किरकोळ दुरुस्तीची कामे करून लवकरच हे कार्यालय नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

कोविड काळापासून भाग्योदय मंगल कार्यालय बंद अवस्थेत आहे. तेथे विद्युतीकरण व काही दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. तसेच, तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. तेथील नागरिकांनी कार्यालय पुन्हा सुरू करण्याची मागणी आमदार जगताप यांच्याकडे केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार या कार्यालयाच्या स्वच्छतेसाठी मंगळवारी अभियान राबविण्यात आले. तेथील सर्व प्रकारचा कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली. तसेच, जेटिंग मशिनच्या माध्यमातून संपूर्ण कार्यालय धुवून स्वच्छ करण्यात आले. परिसरातील नागरिकांनीही यात सहभाग घेतला.

दरम्यान, कार्यालयाचे शटर, विद्युतीकरण व इतर किरकोळ दुरुस्त्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच हे कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी खुले करण्यात येईल, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे