ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर जिल्हा शासकीय रूग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा, सिव्हिल सर्जनला पोलिसांची नोटीस

अहिल्यानगर

जिल्हा शासकीय रूग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया गंभीर गैरव्यवहारात अडकली असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तांत्रिक तपासातून उघड झाले आहे. दस्तऐवजांची पडताळणी करताना तब्बल 142 दिव्यांग प्रमाणपत्रे डबल जावक क्रमांकाने नोंदवून जारी केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या संशयास्पद प्रमाणपत्रांबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना नोटीस बजावून सर्व माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिव्यांग प्रमाणपत्र प्रणालीतील आयडी व पासवर्ड चोरी झाल्याची फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात सुमारे एक वर्षापूर्वी दाखल होती. हा तपास दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याची गंभीर दखल घेत प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. आर्थिक शाखेच्या पथकाने तपासाला गती देत डिजिटल आणि दस्तऐवजांचा तपास केला. त्यात डबल जावक क्रमांक वापरून जारी केलेल्या 142 संशयास्पद प्रमाणपत्रांचा खुलासा झाला.

या संशयास्पद प्रमाणपत्रांबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना नोटीस बजावून सर्व माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून सर्व नोंदी, प्रमाणपत्रे, लॉगिन माहिती व संबंधित अधिकारी- कर्मचार्‍यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, आणखी काही अधिकारी वा एजंट यात सहभागी असण्याची शक्यता तपासली जात आहे.

नऊ संशयित निष्पन्न

आतापर्यंतच्या तपासात एकूण नऊ संशयित आरोपींची भूमिका निष्पन्न झाली आहे. यामध्ये तिघे जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी आहेत. काही आरोपींना अटक करण्यात आली असून काहींना उच्च न्यायालयाकडून तात्पुरता जामीन मिळाला आहे. तर दोन आरोपी अद्याप पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. एका संशयित आरोपीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे