ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीत स्वतःला अर्पण करणारे नांदेड येथील भारत विश्वनाथ रामीनवार यांनी आपल्या भक्तीचा अनोखा ठसा उमटवत आळंदीमंदिरास तब्बल एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या मुकुटाची किंमत सुमारे एक कोटी पाच लाख रुपये असून, ही अर्पण भेट त्यांच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचा प्रतीक ठरत आहे.

भारत रामीनवार हे गेल्या दहा वर्षांपासून माऊलीच्या पालखी सोहळ्यात सातत्याने सेवा बजावत असून, नातेपुते येथे ते दरवर्षी १५० ते २०० क्विंटल भंडाऱ्याचे आयोजन करतात. यात हजारो वारकऱ्यांसाठी भाकर-पिठलं, गांधी कांदा, पिण्याचे पाणी, चहा-बिस्कीट आदींची दिलखुलास सेवा केली जाते.

श्री भारत विश्वनाथ रामीनवार हे माऊलीचे एक निष्ठावान भक्त म्हणून ओळखले जातात. भक्तिभावाने प्रेरित होऊन त्यांनी हा सोन्याचा मुकुट मंदिर समितीकडे अर्पण केला असून, त्यांच्या या उदात्त कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे