ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सोशल मीडियावर महिलेची बदनामी भोवली , नगर शहरात गुन्हा दाखल

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेच्या तक्रारीवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला आणि त्यांच्या ओळखीचे दत्तात्रय खेमनर यांचे एकांतातील खाजगी फोटो फेसबुकवर सार्वजनिक करून त्यांच्या वैयक्तिक गोपनीयतेचा भंग केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी जय ओबीसी नावाचे फेसबुक पेज आणि हर्षवर्धन बारवकर या फेसबुक खातेधारकाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि दत्तात्रय खेमनर यांनी संमतीने काढलेले खाजगी फोटो या फेसबुक पेजेस आणि खात्यावरून अनधिकृतपणे प्रसारित करण्यात आले.

२७ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.आपली बदनामी करण्याच्या आणि एकांतपणाचा भंग करण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेमुळे खळबळ उडाली असून सोशल मीडियाचा गैरवापर करणार्‍यांविरुद्ध सायबर पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे स्वतः करत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे