ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यावसायिकावर लाकडी दांडक्याने हल्ला

अहिल्यानगर

दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यावसायिकावर लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी (28 मार्च) रात्री 9:10 वाजताच्या सुमारास अहिल्यानगर- मनमाड रस्त्यावरील सावेडी परिसरातील हॉटेल संजोग समोर घडली.

शेख मोहसीन अब्दुल कादर (वय 41, रा. जुने कलेक्टर ऑफिस जवळ, हातमपुरा, अहिल्यानगर) असे जखमी व्यावसायिकाचे नाव असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ शेख फिरोज ईस्माईल (वय 50, रा. जुने कलेक्टर ऑफिस जवळ, हातमपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीरून अनोळखी चार जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी (29 मार्च) पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मोहसीन अब्दुल कादर हे मनमाड रस्त्यावरील आपले मोबाईलचे दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतत होते. रात्री 9:10 वाजेच्या सुमारास संजोग लॉनजवळ एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला कट मारला.

यावरून झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संबंधित अज्ञात इसमाने फोन करून आपल्या तीन मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. या चौघांनी मोहसीन यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

या वादात एकाने मोहसीन यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरात प्रहार केला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर संशयित आरोपी तिथून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहसीन यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले,

मात्र पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून मारहाण करणार्‍यांचा शोध सुरू केला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे