ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शिवसेनेच्या विद्यमान आमदारांच्या मुलाचे पुण्यातून अपहरण पोलिसांकडून तपास सुरू

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

माजी मंत्र्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या विद्यमान आमदाराच्या मुलाचे पुण्यातून अपहरण पोलिसांकडून तपास सुरू माजीमंत्री आणि शिवसेना विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाला आहे.याप्रकरणी अपहरणाची तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे.तानाजी सावंत यांचा मुलगा अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुण्यातून अपहरण करण्यात आले. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नऱ्हे परिसरातून स्विफ्ट गाडीतून त्याचे अपहरण करण्यात आले अशी माहिती समोर आली आहे.

सिंहगड रोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अधिक तपास सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे