ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

चौंडी येथे उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने पुण्यातील दवाखान्यात हलवले

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावे या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा पंधरवा दिवस आहे. तरी देखील सरकार आणि आंदोनकर्ते यांच्यातील चर्चेतून अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या एका आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्याला पुणे येथे हलवण्यात आले आहे. त्याला आधीच अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याच्या प्रकृतीत जास्त सुधारणा झाली नव्हती.

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. अखेर राज्य सरकारला आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा लागला आहे. त्यासाठी मराठा समाजाने चाळीच दिवसांची मुदत दिली आहे. याच दरम्यान धनकर समाजाच्या आरक्षणासाठी देखील चौंडी येथे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते.

गिरीश महाजन यांची भेट
अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावे या मागणीसाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. आंदोलकांची मंत्री गिरीश महाजन यांनी देखील भेट घेतली होती. तसेच सरकारच्या वतीने लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन देखील दिले होते. मात्र, सरकार आणि आंदोलक यांच्यात एकमत झाले नाही. त्यामुळे हे आंदोलन अद्यापही सुरूच आहे.

काय आहेत मागण्या

  • आंदोलनाची शासनाने तात्काळ दाखल घेऊन मार्ग काढावा
  • धनगर समाजाला तातडीने अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण द्यावे
  • मुंबई उच्य न्यायालयामध्ये महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचाच्या वतीने दाखल याचिकेची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करावी
  • केसाचा संपूर्ण खर्च राज्य शासनाने उचलावा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे