अहमदनगर जिल्हा ऑटो संघटना फेडरेशन ऑटो रिक्षा विद्यार्थी वाहतूक तीन चाकी व चार चाकी टेम्पोचालक टेम्पो चालक मालवाहतूक बंद बंद
अहमदनगर - शहर प्रतिनिधी ,सागर सब्बन

अहमदनगर शहरात दिनांक 19 / 6 / 2024 रात्री 12 वाजल्यापासून दिनांक 20 /6/2024 रात्री 12 वाजेपर्यंत सर्ब वाहने बंद ठेवण्यात आले होते.
महाराष्ट्र ऑटो रिक्षा संघटना संयुक्त यांच्या वतीने सर्व ऑटो रिक्षा चालक व चार चाकी विद्यार्थी वाहतूक संघटना दिनांक 20 रोजी पूर्ण बंद होऊन ठेवण्यात आले होते .आ ,टि ,ओ च्या नवीन नियमा विरोधात हा बंद पुकारण्यात आला होता.
दिनांक 20 रोजी संपूर्ण शहरात चांगला प्रतिसाद प्रतिसाद मिळाला रिक्षा चालकांच्या विविध मागण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता. (1)परवानाधारक ऑटो रिक्षा फिटनेस लेट फी 50 रुपये दंड रोज रद्द करावा. ( 2) महाराष्ट्रातील परवाना धारक रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याचे कामकाज लवकर चालू करावे. (3) महाराष्ट्र सरकार ऑटो रिक्षा चालकांचे मुक्त परवाने धोरण बंद करावे. (4) अहमदनगर उपप्रादेशिक वाहतूक कार्यालय मध्ये ऑटो रिक्षा चालकांचे कामे रिक्षा पासिंग कामकाज व इतर कामासाठी आरटीओ ऑफिस मध्ये मदतनीस नेमुन करावे. व एजंट आर्थिक लूट थांबवावी.
या मुख्य मागणीसाठी नगर शहरातून मुख्य मार्गावरून रॅली काढण्यात आली होती. जुने बस स्थानक पासून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना फार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली होती . माळीवाडा पंचपीर चावडी , माणिक चौक , कापड बाजार ,नेता शुभाष चौक , चितळ रोड , दिल्ली गेट , पत्रकार चौक , डीएसपी चौक , कलेक्टर ऑफिस येथे समारोप करण्यात आला होता.
कलेक्टर ऑफिस येथे आल्यावर आपल्या नगर शहराचे खासदार निलेश लंके साहेब व आमदार संग्राम भैय्या जगताप यांनी उपस्थिती यांची उपस्थिती झाली. पूर्ण जिल्ह्यातून विविध पदाधिकारी यांनी भेट दिली व जिल्हा ऑटो रिक्षा चालक व टॅक्सी चालक मालक संघटनेचे (अध्यक्ष) अविनाश तात्या घुले , कृषी समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी (सदस्य ) विलास करावे पाटील.(उपाध्यक्ष) दत्ताभाऊ वामन (सरचिटणीस )अशोक औसिकर व विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.
नगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके साहेब यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की मी तुम्हाला आश्वासन देतो की लवकर लवकर मी राज्याचे परिवहन मंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी या विषयावर चर्चा करून आपले प्रश्न मार्गी लागेल अशा आश्वासन देतो व दोन-तीन दिवसात केंद्र मंत्री यांना भेटून चर्चा करणार व लवकरात लवकर सर्व कामे मार्गी लावू व रिक्षा चालक कष्टकरी आहे हे मी जानतो.असे त्यांनी सांगितले त्यानंतर आमदार साहेबांनी भाषण थोडक्यात भाषण झाले ते म्हणाले.
येत्या 27 तारखेला मुंबई येथे अधिवेशन आहे यामध्ये मुख्यमंत्री साहेबांचा बोलणे झालेले आहे व त्यांनी या अधिवेशनात आपण या व आपण त्या विषयावर तुमच्या प्रश्नावर चर्चा करू अशा आश्वासन त्यांनी दिलेत व लवकरात लवकर आपल्या प्रश्न सोडवून अशा आश्वासन दिले.